महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे आरुणि विद्यामंदिर बाल मनोहर मंदिर बालवाडीचे 75 वे वर्ष पूर्ण होत आहे .पुढील वर्षात बालवाडी 76 व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे .आरुणि विद्यामंदिर सातारा येथे दोन शाखा भरतात. एक शाखा करंदीकर वाडा सातारा येथे भरते. आणि दुसरी शाखा यादोगोपाळ पेठ सातारा येथे भरते. प्रथम करंदीकर वाड्याच्या इतिहासाबाबत जाणून घेऊयात. करंदीकर वाडा हा 1850 च्या सुमारास पांडुरंग करंदीकर यांनी बांधला. त्यातील काही भाग दादासाहेब करंदीकर यांनी वाढवला. या वाड्याचे बांधकाम तात्कालीन पद्धतीने करण्यात आलेले आहे. सागवान, लाकडी खांब , तुळ्या यांच्या आधारावर मूळ रचना केलेली आहे. छतांकरिता लाकूड वापरले आहे. भिंती ,चपट्याविटा, मातीची सांधेभरणी, लाकडी फळ्या आणि मातीचे लिंपण करून बनवल्या आहेत. वाड्याला दोन चौक आहेत .पुढच्या चौकात दर्शनी भागात माडीवर जायला गोल जिना आहे .मुख्य दरवाजा म्हणजे दिंडी दरवाजातून आत गेल्यावर ओसरी मुख्य चौक माजघर डावीकडे मोठे सोपे ज्यात दत्ताचे देऊळ आहे. मागे गेल्यावर परसबाग आहे. अशा दिमाखदार प्राचीन परंपरा लाभलेल्या वाड्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे .अर्थात त्याच्या मूळ स्वरूपाला कोणताही धक्का न लावता या पेशवे कालीन वाड्यामध्ये आरुणि विद्या मंदिर बालवाडीचे एक शाखा भरते.
दुसरी संस्थेच्याच जानकीबाई प्रेमसुख झंवर मराठी शाळेमध्ये आरूणि विद्या मंदिर भरते. आरुणि म्हणजे उगवता सूर्य उगवता सूर्याप्रमाणेच आपल्या बालवाडीतील मुले -मुली कर्तुत्वाचा ,नीतिमत्तेचा, संस्काराचा प्रकाश घेऊन अज्ञान, अस्थिरता ,अनैतिकतेचा अंधार दूर करतील संस्कार म्हणजेच गुणांचा गुणाकार व दोषांचा भागाकार या वयातील 3 ते 5 वर्ष मुला मुलींचे वय टीप कागदाप्रमाणे असते जे जे दिसेल ऐकतील त्यांचे संस्कार मनावर कोरले जातात आपल्या दोन्ही शाखांमध्ये (NEP ) अर्थात नवीन शिक्षण प्रणालीमध्ये सांगितलेल्या जास्तीत - जास्त मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश केला गेला आहे.मुलींचा मानसिक ,बौद्धिक, शारीरिक विकास ,सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक सर्व खेळ व साधने यांचा समावेश आहे
.संस्कृत Skill वाढवणारे तक्ते ,खेळणी ,चित्रे , गाणी, गोष्टी इत्यादी घेतले जातात.शाळांमध्ये सेमी इंग्लिश माध्यमांची ही तयारी करून घेतली जाते .आपले सर्व महत्त्वाचे सण साजरे होतात. आषाढी एकादशी, दहीहंडी ,बेंदूर नागपंचमी, गुरुपौर्णिमा,गणेशोत्सव , दसरा,दिवाळी, बोरन्हाण इत्यादी सण उत्सव साजरे केले जातात. तसेच सर्व नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी ही साजरे केल्या जातात. भरपूर नैसर्गिक उजेड, माती, झाडे ,अंगण ,घसरगुंडी, टेबल - खुर्ची इत्यादी नैसर्गिक व इतर साधनसंपत्तींनी बालवाडी सुसज्ज आहे .CC कॅमेरा, इन्व्हर्टर गार्डन ,आकर्षक मऊ फ्लोर मॅट इत्यादी सुरक्षेचा विचारी केला गेला आहे .अनुभवी प्रेमळ प्रशिक्षित शिक्षक वृंद व सेवक हे बालवाडी मध्ये मुलांना हसत- खेळत शिक्षण देत आहेत .महिन्यातून एकदा खाऊ दिला जातो .नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांना पाणी ,माती, हवा ऊन या सर्व नैसर्गिक संसाधनांच्या सहवासात राहणे खेळणे अपेक्षित आहे. यांची पूर्तता शाळेत नक्कीच होते.
आरोग्य ,आनंद, आकलन, आत्मनिर्भर ,अनुभव ,आपुलकी, आत्मविश्वास ,आराधना, अभिनवता आरुणि विद्या मंदिर सातारा अशा विविध मूल्यांद्वारे बाळचमुंचा चा सर्वांगीण विकास साधला जातो. साताऱ्यातील आरुणि विद्यामंदिर एक आदर्श बालवाडी म्हणून नावारूपाला आली आहे .175 वर्षाचा वाड्याचा इतिहास व या वास्तू मधील शाळेची 76 वर्षाची वाटचाल हा एक सुंदर योगायोगच म्हणावा लागेल.